दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी ‘टूलकिट’साठी १५ हजारांचे अर्थसहाय्य; शासन निर्णय जाहीर

दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी ‘टूलकिट’साठी १५ हजारांचे अर्थसहाय्य; शासन निर्णय जाहीर

मुंबई : Government of Maharashtra च्या दिव्यांग कल्याण विभागाने प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आवश्यक साधनसामग्री (टूलकिट) खरेदी करण्यासाठी कमाल १५ हजार रुपयांपर्यंत वित्तीय सहाय्य देण्याचा शासन निर्णय २८ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर केला आहे.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ आणि राज्याच्या दिव्यांग धोरण २०१८ अन्वये ही नवी योजना लागू करण्यात आली असून, शासकीय किंवा शासनमान्य संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या १८ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे. प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांची निवड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून केली जाणार असून, मंजूर निधी थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. व्यवसाय सुरू झाल्याची खातरजमा करण्यासाठी जिल्हा स्तरावर पाहणीही केली जाणार आहे.

या निर्णयामुळे दिव्यांगांच्या उद्योजकतेला चालना मिळून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण साध्य होईल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *