📰 वीज अपघातात मृत्यू झाल्यास मदत आता ४ लाख रुपये
मुंबई – वीज अपघातात (महावितरणच्या कर्मचाऱ्यांशिवाय इतर व्यक्तींचा) मृत्यू झाल्यास वारसांना मिळणारी मदत आता दुप्पट झाली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) नुकताच हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
याआधी मृत व्यक्तीच्या कुटुंबाला २ लाख रुपये मदत दिली जात होती. आता ही रक्कम वाढवून ४ लाख रुपये करण्यात आली आहे. हा निर्णय शासनाच्या निकषांप्रमाणेच आहे.
महावितरणच्या संचालक मंडळाने १२ जानेवारी २०१६ रोजी घेतलेल्या ठरावानुसार हे परिपत्रक ९ मार्च २०१६ पासून लागू झाले आहे.
कंपनीची मालमत्ता नैसर्गिक आपत्तीमध्ये नष्ट झाल्यास त्याची भरपाई राज्य आपत्ती निवारण निधीतून (SDRF) घेण्यात येईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे वीज अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे.