लोहारा पोलिस ठाण्यात लाचखोरीचा पर्दाफाश; एपीआयसह चार पोलिसांना एसीबीची अटक

लोहारा पोलिस ठाण्यात लाचखोरीचा पर्दाफाश; एपीआयसह चार पोलिसांना एसीबीची अटक

 

आवाज माझा न्यूज नेटवर्क

 

धाराशिव, दि. १२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सोलापूर आणि पुणे पथकांनी संयुक्त कारवाई करत लोहारा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचाऱ्यांना लाचखोरी प्रकरणात अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

 

तक्रारदाराच्या मित्रावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याला सहआरोपी न करण्यासाठी या चौघांनी मिळून सुरुवातीला सोन्याचे कडे आणि रोख रक्कम घेतली होती. तरीदेखील त्यांनी आणखी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणात पोलिस नाईक अर्जुन तिघाडे याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले.

 

या घडामोडीनंतर पोलिस निरीक्षक (प्रभारी) ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस शिपाई आकाश भोसले आणि निवृत्ती बोळके यांच्याविरुद्धही गुरुवारी (ता. १२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

लाचखोरीसारख्या गंभीर प्रकरणात थेट पोलिस दलातील अधिकाऱ्यांचा सहभाग उघड झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, या कारवाईमुळे एसीबीच्या कारभाराचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *