डॉक्टरांनी दवाखान्यात नोंदणीप्रमाणपत्र लावणे आजही बंधनकारक

डॉक्टरांनी दवाखान्यात नोंदणीप्रमाणपत्र लावणे आजही बंधनकारक

राज्यातील अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी व दंतवैद्यकीय क्षेत्रातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या दवाखान्यात नोंदणीप्रमाणपत्र रुग्णांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे अनिवार्य असल्याचा शासन आदेश आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दि. २ जुलै २००३ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे.

या परिपत्रकानुसार, महानगरपालिका, नगरपरिषद व तहसीलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील दवाखान्यांची तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले असून, नियमांचे पालन न झाल्यास संबंधित डॉक्टरांना सुधारणा करण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्याच्या सूचना आहेत. मुदतीनंतरही नियमाचे पालन न झाल्यास, संबंधित प्रकरण वैद्यकीय परिषदेकडे पुढील कारवाईसाठी पाठवता येते.

सदर आदेश आजही लागू असून रद्द करण्यात आलेला नाही. अलीकडे काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य प्रशासनाकडून तक्रारी अथवा तपासणीच्या आधारे या आदेशाची अंमलबजावणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *