माझगाव न्यायालयात लाचखोरीचे प्रकरण; लिपिक रंगेहाथ अटकेत, न्यायाधीशासह तपास सुरू

माझगाव न्यायालयात लाचखोरीचे प्रकरण; लिपिक रंगेहाथ अटकेत, न्यायाधीशासह तपास सुरू

 

मुंबई – माझगाव येथील दिवाणी सत्र न्यायालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. तपासात समोर आले की, अटकेनंतर लिपिकाने अतिरिक्त सत्र न्यायाधीशांशी संपर्क साधून लाच स्वीकारण्यास मंजुरी घेतली होती.

 

पडताळणीदरम्यान स्पष्ट झाले की, वासुदेव या लिपिकाने तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारण्यात संमती दर्शविली होती. ११ नोव्हेंबर रोजी एसीबीने आयोजित सापळा कारवाईत त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर वासुदेव यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुददीन सलाउददीन काझी (५५) यांना कॉल करून लाच स्वीकृतीची माहिती दिली होती. न्यायाधीशांनीही त्यास मान्यता दिल्याचे समोर आले आहे.

 

एसीबीने वासुदेवसह काझी विरुद्ध गुन्हा नोंदवला असून, वासुदेवला अटक करण्यात आली आहे. न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या घरांवर झडतीसाठी परवानगी मागण्यात आली असून पुढील कारवाई लवकरच सुरू होईल, असे एसीबीने सांगितले.

 

पूर्वीची कारवाई

 

यापूर्वी, गेल्या वर्षी एसीबीने साताऱ्यातील जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि तीन अन्य व्यक्ती विरुद्ध ५ लाख रुपयांच्या लाच प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. त्या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती.

 

> एसीबीच्या कारवाईमुळे न्यायालयीन भ्रष्टाचारावर लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *