पाटोदा तहसीलदारांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द; ‘आम्ही वाचक’च्या पाठपुराव्याला यश
बार्शी | प्रतिनिधी
खोट्या माहितीच्या आधारे मिळवलेले प्रमाणपत्र रद्द करण्याची नागरिकांची मागणी अखेर मान्य झाली आहे. पाटोदा तहसीलदार दत्ता बळीराम निलावाड यांचे जातवैधता प्रमाणपत्र संबंधित समितीने रद्द केले असून पुढील कायदेशीर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.
या प्रकरणात ‘आम्ही वाचक’ साप्ताहिकाने सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाला कारवाईस भाग पाडले. समितीच्या निर्णयाची अधिकृत प्रत मुख्य संपादक सौ. अनिता पाटील वानखडे यांना देण्यात आली आहे.
जातवैधता गैरवापर प्रकरणात झालेली ही निर्णायक कारवाई प्रशासनातील अनियमिततेविरुद्धचा महत्वाचा टप्पा मानला जात आहे.