सरकारी कार्यालयांत वाढदिवस साजरे करण्यास बंदी

सरकारी कार्यालयांत वाढदिवस साजरे करण्यास बंदी

आयुक्तांचा जीआर – नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

मुंबई : सरकारी कार्यालयांत अधिकारी किंवा कर्मचारी यांनी स्वतःचा वा सहकाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे आता नियमभंग मानला जाणार आहे. यासंदर्भात जमाबंदी आयुक्त व भूमि अभिलेख संचालक, पुणे यांनी नुकतेच परिपत्रक (जीआर) काढून स्पष्ट निर्देश दिले आहेत.

 

कार्यालयीन वेळेत केक कापणे, गेटटुगेदर, फोटोसेशन, रील्स शूट करणे अशा प्रकारांमुळे सरकारी कामकाजात अडथळा येतो. त्यामुळे शासकीय कार्यालयात वाढदिवस वा इतर वैयक्तिक कार्यक्रम साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

या जीआरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोणताही कर्मचारी अथवा अधिकारी आदेशाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. यात इशाऱ्यापासून ते निलंबनापर्यंतची कारवाई होऊ शकते.

 

प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेतली असून, संबंधित कार्यालय प्रमुखांना आदेश दिले आहेत की, कार्यालयीन वेळेत वाढदिवस साजरे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *