भ्रष्टाचारात महाराष्ट्र पुन्हा अव्वल – NCRB च्या अहवालातून धक्कादायक माहिती
देशभरात भ्रष्टाचार आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील असतानाही प्रत्यक्षात मात्र त्यात घट न होता वाढ होत असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या ताज्या अहवालानुसार, २०२३ मध्येही महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे.
गेल्या वर्षभरात देशभरात एकूण ११३९ भ्रष्टाचार प्रकरणे नोंदवली गेली असून, त्यापैकी तब्बल ७६३ प्रकरणे महाराष्ट्रातच नोंदवली गेली आहेत. या पाठोपाठ उत्तर प्रदेश या राज्याचा क्रमांक लागतो.
हा अहवाल समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराची पातळी व प्रशासनावरील प्रश्नचिन्ह अधिक गंभीर झालं आहे.