खराब रस्त्यांवर टोल आकारता येणार नाही : सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश
नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गांवर वाहतूक कोंडी, खड्डे व खराब रस्त्यांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत प्रवाशांकडून टोल वसूल करणे योग्य नाही, असा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत म्हटले आहे की, रस्ता जर दुरुस्त नसेल, खड्डेमय किंवा वाहनचालकांना त्रासदायक असेल तर टोल वसूल करता येणार नाही.
या निर्णयामुळे महामार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार असून, टोल आकारणीबाबत नवे नियम निश्चित होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर रस्ते विकास व देखभालीसाठी जबाबदार असलेल्या संस्थांवर दबाव वाढला आ
हे.