*स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना* –
*विद्यार्थी-पालक अपघात विमा*
मा. चंद्रकांत दादा पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून
संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली
इंटिग्रेटेड रिस्क इन्शुरन्स ब्रोकर्स यांनी तयार केलेला पॉलिसी नुसार
नॅशनल इन्शुरन्स कंपनी पुणे ऑफिस-3 यांची या योजनेच्या राज्यभर अंमलबजावणीसाठी निवड झाली.
मात्र 73 रुपयांमध्ये पाच लाखाचे अपघाती विमा संरक्षण या योजनेद्वारे विद्यार्थी-पालक यांना दिले जाते.
या योजनेअंतर्गत *पालकाच्या* अपघाती मृत्यूचा पहिला क्लेम बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी यांच्यामार्फत फेब्रुवारी 2026 मध्ये सादर करण्यात आला.
नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या पुणे ऑफिसने हा क्लेम अतिशय तातडीने आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सातच दिवसांमध्ये रु. चार लाख 40 हजारचा विमा दावा मंजूर केला. आणि सदरचे दावा मंजुरीचे पत्र टोकन चेकच्या स्वरूपात स्वतः कॉलेजमध्ये जाऊन श्री राहुल पाटील, मॅनेजर आणि अंजू शिंदे डेप्युटी मॅनेजर यांनी प्रदान केले आणि मयत संजय यांच्या पत्नी, मुलगी चुलते यांचे सांत्वन केले.
श्री राहुल पाटील यांनी थोडक्यात ही योजना आणि इतर सुरक्षा विमा विषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन जागृती केली.या कामी कॉलेजच्या सर्व स्टाफने व विशेषता कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब पाटील सर यांनी अतिशय तत्परतेने कागदपत्रांची पूर्तता करून दावा मंजूर करण्यामध्ये मोलाचा सहभाग दर्शविला.
त्यावेळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री पी. टी. पाटील सर, तसेच सुलाखे कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य कारंडे सर आणि कॉलेजचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.