📌 सुयश विद्यालयाच्या बेकायदेशीर इमारतीविरोधात आमरण उपोषण
बार्शी : सुयश विद्यालय (गट क्र. ७९९, बार्शी) येथील बेकायदेशीर इमारतीवर नगर परिषद प्रशासनाने अद्याप कारवाई न केल्यामुळे प्रा. डॉ. विलास शिवाजीराो गुंड पाटील यांनी ९ सप्टेंबरपासून नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
त्यांनी माजी शिक्षणाधिकारी व संस्थापक शिवदास नलवडे तसेच पदाधिकारी माधुरी गवळी यांच्यावर शासनाची फसवणूक करून बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप केला आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई न झाल्यामुळे आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले.