श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्थेत विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

 

श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्थेत विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

बार्शी | प्रतिनिधी

श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था, सुतार नेट, कसबा पेठ, बार्शी येथे दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे तसेच भारत शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विलास गुंड-पाटील उपस्थित होते.

यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे यांच्या हस्ते श्री विश्वकर्मा प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमास भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री. संदीप सुतार, श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. निशिकांत सुतार यांच्यासह श्री. बप्पा सुतार, श्री. रमेश सुतार, श्री. विष्णुपंत खांडवीकर, श्री. दीपक सौंदरकर, श्री. सुरेश राऊत, श्री. मुकुंद पालके, लोंढे साहेब, बापू बोरगावकर, श्री. भगवान पालके, श्री. भागवत पालके, समाधान राऊत, श्री. संभाजी सुतार, श्री. रामलिंग क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान शुभांगी सुरेश सुतार यांच्या माध्यमातून भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला समाजबांधवांसह महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. विश्वकर्मा जयंतीनिमित्त एकोप्याचे व भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *