वीज अडचणीत अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; माजी आमदार राजेंद्र राऊत यांची कार्यपद्धती चर्चेत
आवाज माझा न्यूज |
शेतीच्या कामासाठी वीज हा अत्यावश्यक घटक असला तरी डीपी जळणे, फेज बिघाड, लाईन बंद पडणे अशा तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे वारंवार खोळंबत आहेत. पिकांना पाणी देण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर वीजपुरवठा खंडित झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
विजेच्या समस्यांबाबत शेतकरी संबंधित कार्यालयांकडे सातत्याने पाठपुरावा करत असतात. मात्र कर्मचारीअभावी किंवा साहित्य उपलब्ध नसल्याचे कारण पुढे येत असल्याने अनेकदा कामास विलंब होत असल्याचे चित्र आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणारे नेतृत्व म्हणून माजी आमदार राजेंद्र (राजाभाऊ) राऊत यांचे नाव पुढे येत आहे. शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारी त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर संबंधित विभागाशी तात्काळ संपर्क साधण्यात येतो आणि त्यानंतर कामाला गती मिळाल्याची उदाहरणे समोर आली आहेत.
डीपी दुरुस्ती, फेज बिघाड किंवा अन्य तांत्रिक अडचणी असोत, अशा समस्या वेळेत सोडवण्यासाठी समन्वयाची भूमिका बजावली जात असल्याचे स्थानिक पातळीवरील निरीक्षणातून स्पष्ट होते.
लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ पदावर असलेली व्यक्ती नव्हे, तर सामान्य नागरिक आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील दुवा असतो. नागरिकांच्या,शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी समजून घेऊन त्यावर तत्काळ हस्तक्षेप केल्यास विश्वास निर्माण होतो, असे मत व्यक्त केले जात आहे.
राजकीय चौकटीबाहेर पाहिले असता, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वेळेवर दखल घेऊन मदतीसाठी पुढे येणारे नेतृत्व समाजासाठी उपयुक्त ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
✍️ विजय कोरे