📰 करकंबचे मंडल अधिकारी राजेंद्र वाघमारे लाच घेताना रंगेहात पकडले – अँटी करप्शन ब्युरोची कारवाई
📅 दि. 09 ऑक्टोबर 2025 | सोलापूर ग्रामीण
अँटी करप्शन ब्युरो, पुणे घटकाकडून महसूल विभागातील राजेंद्र भगवान वाघमारे (वय 53 वर्षे), मंडल अधिकारी, करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांना रु. 40,000/- लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
तक्रारदाराने विक्री केलेल्या जमिनीची नोंद मंजूर करण्यासाठी आरोपी वाघमारे यांनी रु. 50,000/- लाच मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम रु. 40,000/- वर निश्चित झाली होती. तक्रारदाराने ही बाब 8 ऑक्टोबर 2025 रोजी अँटी करप्शन ब्युरो, पुणे येथे नोंदवली होती.
पडताळणीदरम्यान आरोपीने प्रत्यक्ष लाच मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दि. 09 ऑक्टोबर 2025 रोजी रायगड भवन, तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागे, पंढरपूर येथे सापळा रचण्यात आला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास आरोपी वाघमारे यांनी तक्रारदाराकडून 40,000 रुपये स्वीकारले असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाणे (सोलापूर ग्रामीण) येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजीत पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अर्जुन भोसले (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रविण निंबाळकर, श्री. सुहास हट्टेकर आणि श्री. रविंद्र लांमाते यांच्या पथकाने केली.
🔹 संपर्कासाठी – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे:
📞 दूरध्वनी: 020-26122134 / 26132802 / 26050423 / 9403781064
💬 WhatsApp: 9403781064 (पुणे), 9930997700 (मुंबई)
📧 ई-मेल: dyspacbpune@mahapolice.gov.in
🌐 वेबसाईट: www.acbmaharashtra.gov.in
📱 ऑनलाईन तक्रार: www.acbmaharashtra.net.in
💡 जनतेला आवाहन:
शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून, अथवा त्यांच्या वतीने कोणत्याही एजंटमार्फत कायदेशीर फीव्यतिरिक्त लाच मागितली जात असल्यास, त्वरित अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा.