बार्शी – तलाठी कार्यालय: नागरिकांसाठी माहितीचा मार्गदर्शक
✍️ विजय थोरात | महाराष्ट्र Digital News
बार्शी: तलाठी कार्यालय गावातील जमीन महसूल प्रशासनाचे मुख्य केंद्र आहे. नागरिकांना जमिनीबाबत, पिकांबाबत, महसूल वसुली, अतिक्रमण, सरकारी मालमत्ता आणि ग्रामसंबंधी इतर माहिती सुलभपणे उपलब्ध होऊ शकते.
तलाठी दप्तर नमुने (१–२१)
तलाठ्यांकडे २१ प्रकारच्या नोंदवही आहेत, ज्या नागरिकांसाठी माहितीचा स्रोत आहेत:
नमुना १: गावाचा नकाशा, जमीन गट व सहे नंबर, जमिनीचा आकार
नमुना १अ: वन जमीन व गटांची माहिती
नमुना १ब: सरकारच्या मालकीची जमीन
नमुना १क: पुनर्वसन, सिलिंग, कुळ कायद्यानुसार भोगवट जमीन
नमुना १ड: अतिरिक्त जमीन व तिचा तपशील
नमुना १इ: गावातील अतिक्रमण व कारवाई
नमुना २: बिनशेती जमिनीसंबंधी माहिती
नमुना ३: देवस्थानांसाठी जमिनीची नोंद
नमुना ४: महसूल वसुली व विलंब शुल्क
नमुना ५: गावाचे क्षेत्रफळ, महसूल व जिल्हा कर
नमुना ६: जमिनीच्या व्यवहार, खरेदी व फेरफाराची नोंद
नमुना ७: सातबारा – मालक, सर्वे नंबर, गट नंबर, पिक व आकार
नमुना ८: महसूल वसुली व मागणीसंबंधी नोंद
नमुना ९–१०: शासनाला दिलेल्या पावत्या व महसूल वसुली
नमुना ११–१५: पीक, पाणी, पिकाखालील क्षेत्र व इतर कृषी माहिती
नमुना १६–१८: शासकीय आदेश, नियमावली, पत्रव्यवहार
नमुना १९–२१: सरकारी मालमत्ता, पोस्ट तिकिटे, सर्कल कामाची दैनंदिन नोंद
तलाठ्यांची प्रमुख जबाबदाऱ्या
1. महसूल वसुली वेळेत करणे
2. सातबारा आणि फेरफार नोंदी अद्ययावत ठेवणे
3. पीक निरीक्षण व नुकसान अहवाल तयार करणे
4. अतिक्रमण रोखणे व नोंदवहीत नोंद करणे
5. शासन आदेशांचा अंमल करणे
6. वारस नोंदी ठेवणे
7. ग्राम नकाशे व दस्तऐवज सुरक्षित ठेवणे
8. आपत्ती व नैसर्गिक आपत्तींचा अहवाल तयार करणे
9. निवडणूक, अल्पबचत योजना, सरकारी योजना गावकऱ्यांपर्यंत पोहोचवणे
10. नागरिकांच्या मागण्यांवर त्वरित उत्तर देणे
नागरिकांसाठी माहिती साठी
तलाठी कार्यालयातून तुम्ही सातबारा, फेरफार, अतिक्रमण, महसूल वसुली, पीक नोंदी, लोकसंख्या, सरकारी मालमत्ता याबाबत माहिती मागवू शकता.
RTI (माहिती अधिकार कायदा) वापरून तलाठ्यांच्या कामकाजाचे पालन पडताळता येते.
नागरिकांनी आपले हक्क जाणून घेणे गरजेचे आहे आणि तलाठीची कामे पारदर्शक आहे की नाही हे तपासावे.
तलाठी कार्यालय हे गावकरी आणि शासन यांच्यातील मुख्य दुवा आहे. नागरिकांनी ह्या नोंदींचा फायदा घेऊन पारदर्शक प्रशासन आणि योग्य महसूल वसुली सुनिश्चित करावी.