शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा करणे बेकायदेशीर – नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई

शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा करणे बेकायदेशीर – नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई

 

मुंबई :

राज्य शासनाने स्पष्ट आदेश दिला आहे की कोणताही शासकीय कर्मचारी कार्यालयीन वेळेत वाढदिवस किंवा वैयक्तिक कार्यक्रम साजरा करू शकणार नाही. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई अनिवार्यपणे केली जाईल.

 

शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, अशा कार्यक्रमांमुळे मौल्यवान कामकाजाचा वेळ वाया जातो, कामकाजावर परिणाम होतो आणि कार्यालयीन शिस्त बिघडते. त्यामुळे कार्यालयात वाढदिवस, केक कापणे किंवा इतर समारंभ करण्यास सक्त मनाई आहे.

 

कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक कार्यक्रम कार्यालयाबाहेर किंवा कार्यालयीन वेळेनंतरच करावेत, अन्यथा कडक कारवाई टाळता येणार नाही, असा सरकारचा इशारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *