नागरिकच खरे मालक – लोकशाहीचा खरा अर्थ

🗳️ नागरिकच खरे मालक – लोकशाहीचा खरा अर्थ

 

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळे नागरिकच या देशाचे खरे मालक आहेत, असा संदेश आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री. कामेश घाडी यांनी दिला.

 

त्यांनी सांगितले की, शासन ही जनतेची नोकरशाही असून खरी सत्ता नागरिकांच्या हाती आहे. मतदान, प्रश्न विचारणे, भ्रष्टाचाराविरुद्ध लढणे आणि माहिती अधिकाराचा वापर करणे या जबाबदाऱ्या पार पाडल्यास लोकशाही मजबूत राहते.

 

“आपण गप्प बसलो तर नोकरच मालक बनतो; पण आवाज उठवला तर खरी लोकशाही जिवंत राहते,” असे ते म्हणाले.

 

भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असली तरी तिचं भविष्य नागरिकांच्या जागरूकतेवर अवलंबून आहे. निष्क्रिय नागरिक म्हणजे कमकुवत लोकशाही, तर जागरूक नागरिक म्हणजे मजबूत लोकशाही, असा घडी यांचा संदेश आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *