गौरी-गणपतीत नकली मिठाईचे सावट; ग्राहकांनी घ्यावी खबरदारी

गौरी-गणपतीत नकली मिठाईचे सावट; ग्राहकांनी घ्यावी खबरदारी

 

बार्शी : गौरी-गणपतीच्या सणांमध्ये बाजारपेठेत खवा, मिठाई, दूध यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. मात्र या मागणीचा गैरफायदा घेत नकली खवा व बनावट मिठाई विक्रीस ठेवली जात असल्याचे समोर येत आहे. अशा बनावट खाद्यपदार्थांमुळे अपचन, अन्नविषबाधा, पोटाचे विकार, उलट्या-जुलाब, दीर्घकालीन यकृत व मूत्रपिंडाचे आजार होण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

👉 नकली खवा विक्रीवर कायदेशीर कारवाई

खाद्य सुरक्षा मानके कायदा (Food Safety and Standards Act, 2006) नुसार जर कोणतीही व्यक्ती बनावट खवा, दूध किंवा मिठाई विकताना आढळली तर –

 

कलम 59 अंतर्गत रु. ५ लाखांपर्यंत दंड व सहा महिन्यांपासून आयुष्यभर कारावास होऊ शकतो.

 

तसेच भारतीय दंड संहिता (IPC) कलम 272 व 273 नुसार मिळालेल्या अन्नात भेसळ केल्यास ६ महिने तुरुंगवास व दंड, गंभीर प्रकरणात शिक्षा अधिक कठोर होते.

 

 

👉 तक्रार कुठे करायची?

 

ग्राहकांनी अशा प्रकरणी जवळच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालय (FDA) येथे तक्रार करावी.

 

स्थानिक पोलीस स्टेशन व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथेही तक्रार दाखल करता येते.

 

तक्रारीसाठी हेल्पलाइन : टोल फ्री 1800-222-365 (FDA Maharashtra)

 

 

📌 ग्राहकांसाठी सूचना

 

मिठाई खरेदी करताना बिल घ्यावे.

 

पॅकेजवर उत्पादन दिनांक व FSSAI परवाना क्रमांक तपासावा.

 

अतिशय पांढरा, चिकट किंवा स्वस्तात मिळणारा खवा घेणे टाळावे.

 

 

🎯 या सणात गोडाची खरी चव घेण्यासाठी सावधानता व जागरूकता तितकीच महत्त्वाची आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *