सर्किट बेंच व खंडपीठ : फरक समजून घ्या, कोल्हापूर सर्किट बेंच भविष्यात खंडपीठ होण्याची शक्यता
मुंबई :
न्यायदान सुलभ करण्यासाठी उच्च न्यायालयांतर्गत सर्किट बेंच आणि खंडपीठ ही दोन संकल्पना आहेत. अनेकांना यामध्ये गोंधळ होतो. मात्र दोन्हींच्या रचनेत आणि कार्यपद्धतीत महत्त्वाचा फरक आहे.
सर्किट बेंच म्हणजे काय?
सर्किट बेंच म्हणजे न्यायालयाचे एक तात्पुरते ठिकाण असते. उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ठराविक काळासाठी येथे खटल्यांची सुनावणी करतात.
यांची स्थापना करण्याचा अधिकार मुख्य न्यायमूर्तींना असतो.
अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे काम राज्यपालांकडून केले जाते.
न्यायमूर्तींची नियुक्ती तात्पुरती असते.
खंडपीठ म्हणजे काय?
खंडपीठ हे मात्र कायमस्वरूपी असते.
यासाठी घटनात्मक प्रक्रिया आवश्यक असते.
मुख्य न्यायमूर्ती प्रस्ताव तयार करून सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवतात.
मंजुरीनंतर राष्ट्रपती अधिसूचना काढतात.
येथे न्यायमूर्ती, कर्मचारी, रजिस्ट्री कायमस्वरूपी असतात.
उदा. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रधान खंडपीठ मुंबईत आहे. त्याव्यतिरिक्त नागपूर, औरंगाबाद आणि गोवा येथे कायमस्वरूपी खंडपीठे आहेत.
—
🔹 सारांश :
सर्किट बेंच – तात्पुरते व अधिसूचित स्वरूप
खंडपीठ – कायमस्वरूपी व घटनात्मक प्रक्रिया आवश्यक
—
📍 कोल्हापूरचे सर्किट बेंच भविष्यात कायमस्वरूपी खंडपीठात रूपांतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.