धर्मादाय रुग्णालयांत २४ तास समाजसेवक हजेरी अनिवार्य
गरजू रुग्णांना कोणत्याही वेळी उपचार मिळावेत म्हणून नवीन आदेश
पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना रात्रीसुद्धा उपचार मिळावेत यासाठी धर्मादाय रुग्णालयांनी आता २४ तास समाजसेवक ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
२० ऑगस्ट रोजी झालेल्या धर्मादाय रुग्णालयांच्या देखरेख समितीच्या बैठकीत अनेक रुग्णालयांत पूर्णवेळ समाजसेवक उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यामुळे गरीब रुग्ण निधी (IPF) योजनेंतर्गत मिळणाऱ्या सुविधा रुग्णांना वेळेवर मिळत नव्हत्या. या पार्श्वभूमीवर तातडीने २४ तास समाजसेवक नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील रुग्णालयांची आकडेवारी
महाराष्ट्रात एकूण ४६८ धर्मादाय रुग्णालये
त्यापैकी पुण्यात ५८ व मुंबईत ७४ रुग्णालये
नियमांनुसार प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने शंभर खाटांपैकी १० खाटा निर्धनांसाठी आणि १० खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे आवश्यक
*प्रशासनाची अपेक्षा*
रुग्णांना उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी समाजसेवकांची २४ तास उपस्थिती बंधनकारक केली आहे. आदेशाची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे.” रजनी क्षीरसागर, सहआयुक्त
निर्णयामागचं कारण
समाजसेवक ठरावीक वेळेतच उपलब्ध असल्याने रात्रीच्या वेळी रुग्ण व नातेवाईकांना योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि मदत मिळण्यात अडथळे येत होते. वैद्यकीय सेवा तातडीची असल्याने रुग्ण व गरीब कुटुंबांना त्वरित सहाय्य मिळावे, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरतो.
-#धर्मादायरुग्णालय #२४ताससमाजसेवक #गरजूंचेआरोग्य #IPFयोजना #पुणे #मुंबई