*मत विक्रीचा वाढता धोका; लोकशाहीसमोर मोठे आव्हान पैशासाठी मत देणे म्हणजे स्वतःचे भविष्य गहाण**

 

**मत विक्रीचा वाढता धोका; लोकशाहीसमोर मोठे आव्हान

पैशासाठी मत देणे म्हणजे स्वतःचे भविष्य गहाण**

प्रतिनिधी | महाराष्ट्र

निवडणुका जवळ आल्या की मतदारांना पैसे, दारू, भेटवस्तू देण्याचे प्रकार पुन्हा डोके वर काढताना दिसतात. मात्र, मत विक्री हा केवळ नैतिक प्रश्न नसून तो थेट कायद्याने दंडनीय गुन्हा आहे, याची जाणीव नागरिकांमध्ये होणे गरजेचे आहे. मत म्हणजे लोकशाहीचे सर्वात मोठे शस्त्र असून, ते पैशासाठी विकले गेले तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात.

मतदान : अधिकारही, कर्तव्यही

भारतीय संविधानाच्या कलम 326 नुसार प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान ही केवळ मुभा नसून लोकशाही टिकवण्याचे कर्तव्य आहे. मत विकणे म्हणजे स्वतःच्याच हक्कावर घाला घालण्यासारखे असल्याचे संविधानतज्ज्ञ सांगतात.

पैसे, दारू, वस्तू घेणे-देणे हा थेट गुन्हा

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 अंतर्गत

🔴 कलम 123(1) नुसार मतांसाठी लाच देणे किंवा घेणे हा गंभीर गुन्हा आहे.

यामध्ये —

रोख रक्कम

दारू

साड्या, दागिने

घरगुती उपकरणे

सहली, प्लॉट्स

जात–धर्माच्या नावावर मत मागणे

यांचा समावेश होतो.

शिक्षा काय?

➡ उमेदवाराची निवड रद्द होऊ शकते

➡ सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यास बंदी

➡ फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो

मत विक्रीचे परिणाम नागरिकांनाच भोगावे लागतात

तज्ज्ञांच्या मते,

आजचे ५ हजार रुपये

उद्या ५ वर्षांचे हाल ठरतात.

मत विक्री झाल्यावर —

स्वच्छ पाणी मिळत नाही → आजार, टँकरराज

रस्ते होत नाहीत → अपघात, खर्च

शिक्षण दुर्लक्षित → बेरोजगारी

आरोग्य सेवा अपुरी → खासगी रुग्णालयांची लूट

प्रशासनात पारदर्शकता राहत नाही → भ्रष्टाचार वाढतो

जात–धर्मावर मतदान लोकशाहीस घातक

संविधानाने भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले आहे.

जात–धर्मावर निवडून आलेले प्रतिनिधी अनेकदा — ➡ लोकसेवक न राहता मतबँक सांभाळणारे दलाल बनतात

➡ विकासाऐवजी तणाव, फूट व द्वेष वाढतो

मत विकणारा नेमका कोणाचा शत्रू ठरतो?

✔ स्वतःचा

✔ कुटुंबाचा

✔ मुलांच्या भवितव्याचा

✔ समाजाचा

✔ देशाचा

कारण, वाईट नेता निवडला की त्याची शिक्षा चांगल्या नागरिकांनाही भोगावी लागते.

नागरिकांनी काय करावे?

✔ पैसे, दारू, भेटवस्तू नाकारा

✔ पुरावे मिळाल्यास तक्रार करा

📞 निवडणूक आयोग हेल्पलाईन : 1950

📱 cVIGIL App – फोटो/व्हिडिओसह तक्रार

✔ उमेदवारांना प्रश्न विचारा —

पाणी? रस्ते? आरोग्य? शिक्षण? रोजगार?

निष्कर्ष

मत विकणं म्हणजे भविष्य गहाण ठेवणं.

विकासावर मत दिलं, तरच लोकशाही टिकेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *