ओबीसी आरक्षण उपविभागणीसह जातीनिहाय जनगणनेची मागणी; विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्थेकडून बार्शीत निवेदन
बार्शी : ओबीसी प्रवर्गातील विश्वकर्मीय समाजाच्या आरक्षण विषयक मागण्यांसाठी श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
भारतीय संविधानाच्या कलम ३४० अंतर्गत सन २०१७ मध्ये नेमलेल्या निवृत्त मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आयोगाचा इतर मागास जातींच्या उपवर्गीकरणाचा मसुदा अहवाल सन २०१९ मध्ये पूर्ण झाला असून तो तातडीने स्वीकारावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत ओबीसी जातीवार अखिल भारतीय सर्वेक्षणाकरिता अर्थसंकल्पीय तरतूद करून महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार श्री. बदे यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी श्री. निशिकांत सुतार, श्री. बाप्पा सुतार, श्री. संदीप सुतार, श्री. बंडू सुतार, श्री. पांडुरंग सुतार, श्री. दीपक सुतार, श्री. सतीश पाचकुडवे, श्री. संभाजी सुतार, श्री. अतिश पालके आदी मान्यवर उपस्थित होते.